Résultats de recherche de titre
Articles 1 à 20 sur 253

Aptavani Shreni-4: आप्तवाणी श्रेणी -४
Par Dada Bhagwan. 2016
तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश…
रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. च्च्बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल.ज्ज् दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य
Aptavani Shreni-5: आप्तवाणी श्रेणी -५
Par Dada Bhagwan. 2016
व्यवस्थित शक्ति के द्वारा हमारे जीवन का समस्त सांसारिक व्यवहार डिस्चार्ज हो रहा है। हमारी पाँचों इन्द्रियाँ कर्म के अधीन…
हैं। कर्मों के बंधन का कारण क्या है? यह धारणा की कि ‘मैं चंदुलाल हूँ’ वह कर्म बंधन का मूल कारण है। सिर्फ सच (तथ्य) जानने की आवश्यकता है। यह एक विज्ञान है। इस पुस्तक में परम पूज्य दादाश्री ने पाँच ज्ञान इन्द्रियों तथा उनके कार्यों की प्रणाली के बारे में बताया है। मन-बुद्धि-चित्त-अहंकार, यह सब इन्द्रियों के अलग-अलग कार्य हैं। फिर अपना कार्य करने में कौन असफल रहा? ‘स्व’ रहा। ‘स्व’ का कार्य है जानना, देखना और हमेंशा आनंदमय स्थिति में रहना। हर इन्सान ज़िंदगी के बहाव के साथ आगे बह रहा है। यहाँ कोई भी कर्ता नहीं है। अगर कोई स्वतंत्र कर्ता होता तो वह हमेंशा बंधन में ही रहता। जो नैमित्तिक कर्ता है वह कभी भी बंधन में नहीं रहता। संसार प्राकृतिक परिस्थितियों के प्रभाव से उत्त्पन्न परिणाम पर ही चलता है। ऐसी परिस्थिति में ‘मैं कर्ता हूँ’ की गलत धारणा की उत्पत्ति होती है। इस कर्तापन की गलत धारणा की वजह से अगले जन्म के बीज बोए जाते हैं। इस संकलन में परम पूज्य दादाश्री ने कर्म के विज्ञान, कर्तापन, पाँच इन्द्रियों, अहंकार, मनुष्यों का स्वभाव, ज्ञानियों के प्रति विनय, पापों का प्रतिक्रमण, प्रायश्चित इत्यादि विषयों के बारे में बताया है। यह समझ साधकों को स्वयं के बारे में व संसार में दूसरों से कैसे शांतिपूर्वक व्यवहार करें, इस बारे में मदद करती है।
الفارسات الصغيرات - ماذا اصاب فرسي الصغيرة
Par جاين بتانكورت. 1999
اعتقدت بان أنها تحسن التصرف مع الخيول, حتى بدأت فرسها بروق تتصرف بشكل غريب. صارت الفرس تخالف أوامر فارستها الصغيرة,…
وتمتنع عن الأكل, كما أنها أسقطتها عن ظهرها. لذا راحت الفارسات الصغيرات يبحثن عن السبب. وعلى خلاف اعتقاد بان, كان هناك سبباً أكبر من مجرد استياء بروق منها, لكن هذا السبب استغرق الكثير من البحث المنظم للتوصل إليه. سيجد القراء متعة في متابعة مشكلة بروق والتوصل لنهاية سعيدة.
Arthashastra class 12 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2020
अर्थशास्त्र इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच…
श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांची निर्मिती असलेल्या अर्थशास्त्राच्या ह्या पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या दोन्हींचा परामर्ष घेण्यात आला आहे. उपयोगिता, मागणी, पुरवठा यांचे सिद्धांत, बाजारांचे प्रकार इत्यादी सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पनांचे विस्तृत विवेचन केले आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील नाणेबाजार व भांडवल बाजार, विदेशी व्यापार ह्या स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना या अभ्यासक्रमात प्रथमच विद्यार्थ्यांसमोर ठेवत आहोत. महत्त्वपूर्ण बदल म्हणजे संख्याशास्त्रातील निर्देशांक मापकाचा ह्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे.
الناصر صلاح الدين الأيوبي: نظرة الغرب لبطل الشرق (Studies In The History And Anthropology Of Religion Ser. #1)
Par د.مجدي عز الدين حنفي. 2007
هذا الكتاب يبرز نبذة مختصرة عن حياة القائد صلاح الدين الأيوبي. أردتُ أن أُظهِر رؤية الغرب لصفات ومميِّزات وعيوب هذه…
الشخصية الأسطورية المسلمة مِن خلال ترجمة مصادر إنجليزية وفرنسية عديدة، وكذلك استشارة مصادر عربية فيما يتعلَّق ببعض التفاصيل التاريخية والدينية، وبذلك تتعدَّد زوايا قراءة تاريخه. أبهرني إظهارهم للحقيقة بدون مبالغة، وتقييمهم ونقدهم البَنَّاء، فإذا كان هذا رأي الغرب (الصليبيِّين) فيه، فما بالك بحقيقة شخصيَّته مِن وجهة نظر معاصِريه؟ توجد مساحات لَم يسلَّط عليها الضوء في سيرته الذاتية، نعلم الكثير عن إنجازاته، ونعلم القليل عن شخصيَّته، مثله مثل غيره مِن حُكَّام العصور الوسطى. الفصول الثلاثة الأخيرة مِن الكتاب تتناول ما نستطيع أن نتعلَّمه مِن هذه الشخصيَّة، وكيف يمكننا الاستفادة مِن أخلاقه وأفعاله.. أرجو مِن الله أن تتمتَّعوا وتستفيدوا مِن هذا العمل.
الشافية في علم التصريف
Par جمال الدين أبي عمرو عثمان بن عمر الدويني. 2015

The Darker Side: द डार्कर साईड
Par Cody McFadyen. 2023
अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो.…
एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ. बी. आय. ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका…
Lost Horizon: लॉस्ट होरायझन
Par James Hilton. 2013
जिथं काळ निश्चल राहतो! हिमालयीन पर्वतांच्या उंच भिंती असलेल्या एका दूरवरच्या तिबेटियन दरीत स्वप्नातीत असा शांग्रिलाचा मठ आहे. भारतातून अपहरण…
करून आणलेलं विमान कोसळल्यावर, ह्यूज कॉन्वेला त्या शांग्रिलाच्या मठात आणलं जातं. तिथे त्याला काहीतरी गूढपणा जाणवतो. हे उड्डाण कोणी नियोजित केलं होतं? असं कोणतं रहस्य होतं जे त्या आदरणीय लामाने दडवून ठेवलं होतं? पियानोसारखं वाद्य वाजवणारी ती सुंदर चिनी मुलगी ह्या अशा विचित्र जागी कशी आली? हळूहळू कॉन्वेला ते असंभवनीय सत्य कळतं... तुम्ही ‘लॉस्ट होरायझन’ ह्या पुस्तकात पार गुंगून जाल.
Deception Point: डिसेप्शन पॉईंट
Par Dan Brown. 2001
आर्क्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या…
राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. ३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले. तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न. दा विंची कोड व एंजल्स ॲण्ड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका. हा सारा चित्तवेधी प्रकार श्री. अशोक पाध्ये यांनी मराठीत आणला आहे.
Akherache Parv: अखेरचे पर्व
Par Vijaya Rajadyaksha. 1988
विजयाताईंच्या 'अखेरचे पर्व' या कथासंग्रहात पूर्वप्रकाशित बारा कथांचा अंतर्भाव आहे. त्या त्या दिवाळी अंकाचा स्वभाव किंवा अभिरुचीनुसार या लिहिल्या असल्या…
प्रत्येक कथेतून मानवी मनाचे... त्यातल्या भावभावनांचे वेगवेगळे पैलू अधोरेखित होतात. कथांतून जे काही घडतं ते वास्तवाच्या परिघातलं असतं. स्वभावदोषामुळे कधी विस्कळीत होणारी, तर सद्भावनेमुळे जोडली जाणारी नाती नित्य प्रसंगांतून व्यक्त होत राहतात. पिढ्यांतील वैचारिक अंतर... मतभेद... क्वचित्प्रसंगी निर्माण होणारा संघर्ष हा सार्वत्रिक अनुभव विजयाताईंच्या सिद्धहस्त लेखणीतून वेगवेगळ्या रूपाने कथाबद्ध होतो. या कथा वाचताना आपल्याला असे जाणवते, की त्या अतिरंजित किंवा अ-वास्तव नाहीत. त्यात कल्पनाविलास नाही. दाद मिळवण्याच्या अभिप्सेने अनिवार्यपणे येणारा लालित्याचा अभिनिवेश नाही. भाषा साधीसोपी मनाला भिडणारी... कथाप्रवाहात वाहून नेणारी आहे. कथेत नाट्य असलेच तरी ते जीवनानुभवाच्या स्तरावरचे आहे. कथा सुखांतिक असेल, तर आपण मोरपिसांचा स्पर्श अनुभवतो आणि शोकांतिक असेल, तर मळभ दाटल्यासारखे अस्वस्थ होतो. कथांतील काही प्रसंग आपल्या पाहण्यातले किंवा कदाचित आपल्या घरात घडल्यासारखे वाटत राहतात. कधी त्यातल्या पात्रांची विचारसरणी आपल्याशी कुठेतरी जुळते असे जाणवत राहते. थोडक्यात, कथाबीजातील 'सर्वसमावेशकता' हे विजयाताईंच्या लेखनातील महत्त्वाचे वैशिष्ट आहे. या संग्रहातील काही कथांचा शेवट वाचकांनी कल्पावा, असा विजयाताईंचा मानस दिसतो. एकूणच अवश्य वाचावा आणि 'फील' करावा असाच हा कथासंग्रह आहे.
A Twist in the Tale: अ ट्विस्ट इन द टेल
Par Jeffrey Archer. 2021
भांडणाच्या भरात एका प्रियकराकडून त्याच्या प्रेयसीचा खून होतो आणि अटक मात्र भलत्याच माणसाला होते... एकदम वेगळ्याच प्रकारचं वाईन टेस्टिंग... एका…
अनोळखी पुरुषाबरोबर प्रणयाचा खेळ... गोल्फ क्लबहाउसच्या बारमध्ये जुंपलेलं आगळंवेगळं भांडण... कॉर्नफ्लेक्स खाण्यावरून सुरू झालेलं वैमनस्य आणि त्यातून उद्भवलेली ईर्ष्या... अत्यंत धूर्तपणे रचलेलं कथानक, अत्यंत वेगवान आणि मनोरंजनाने ओतप्रोत भरलेल्या या कथांमधून हाताळण्यात आलेल्या काही विषयांची ही छोटीशी झलक... चित्तथरारक सुरुवात आणि धक्कादायक शेवट असलेल्या... सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या लेखकाच्या लेखणीतून उत्तरलेल्या रहस्यमय, उत्कंठा वाढविणाऱ्या कथांचा संग्रह.
Gomant Bharati Pustak Dusare Tritiy Bhasha-Marathi class 9 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक दुसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता नववी - गोवा बोर्ड
Par Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal. 2023
इयत्ता नववीसाठी गोमंत भारती पुस्तक दुसरे (मराठी तृतीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण…
मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग आणि आधुनिक काव्य विभाग असे तीन विभाग आहेत.
Gomant Bharati Pushpa Pachave Dviteey Bhasha-Marathi class 12 - Goa Board: गोमंत भारती पुष्प पंचम दुसरी भास-मराठी मानक बारावो - गोवा बोर्ड
Par Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal. 2023
इयत्ता बारावीसाठी गोमंत भारती पुष्प पाचवे (मराठी द्वितीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण…
मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. त्यामुळे स्थानिक सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा, लोककथा, वैज्ञानिक दृष्टीकोन, निसर्ग जागृती आणि इतर शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन या पुस्तकातील गद्य आणि पद्य साहित्य निवडण्यात आले आहे. गद्य शैलीची ओळख करून देण्यासाठी धड्यांमध्ये पथनाट्य आणि मुलाखती समाविष्ट आहेत.
The Lost Symbol: द लॉस्ट सिम्बॉल
Par Dan Brown. 2009
फ्रीमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होता. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता.…
पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामथ्र्य प्राप्त करून घ्यायचे होते. पिढ्यानपिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली; तिच्यावरून आता खून, हिंसा, छळ सुरू झाले. ते एवढ्या थराला पोहोचले की, शेवटी अमेरिकेची शासनव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली. मग चोवीस तासांत एक थरारक व रोमहर्षक नाट्य सुरू झाले… रेल्वे, हेलिकॉप्टर यांमधून सीआयएच्या माणसांनी पाठलाग सुरू केले… सरकारची नाडी आता खुनी माणसाच्या हातात आली होती! त्याला स्वत:ला ‘देव’ बनायचे होते. त्यातून मग प्राचीन विद्या, धर्मग्रंथ, कुणाचेतरी बळी अशा घडामोडी घडत गेल्या… शेवटी यातून माणसाने गमावलेले ‘ते चिन्ह’ त्याला गवसले का?... चोवीस तासांतील या घटना तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. डॅन ब्राऊनच्या इतर तीन कादंबऱ्यांएवढीच ही एक अगदी अलीकडची उत्कंठावर्धक कादंबरी!
The Last Don: द लास्ट डॉन
Par Mario Puzo. 1996
कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून…
कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची... फार कशाला, साऱ्या जगाची डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं', तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां'चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बऱ्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द लास्ट डॉन' ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.
Sanwad: संवाद
Par Achyut Godbole. 2018
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, म्हणूनच इतिहासात डोकावून बघितलं तर आदिम काळापासून मनुष्य समूहानं किंवा टोळ्यांनी राहत असलेला बघायला मिळतो.…
अगदी सुरुवातीला माणलानं एकमेकांशी संवाद कसा साधला असेल? या प्रश्नाच्या कुतूहलातूनच अच्युत गोडबोले यांचं ‘संवाद’ हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. ‘संवाद’ या पुस्तकात चित्रलिपीद्वार, खाणाखुणा करून, वेगवेगळे आवाज करुन आदिमानवाच्या परस्परांतल्या संवादाला कशी सुरुवात झाली याचा इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर शेतीमुळे स्थैर्य आल्यानंतर माणसाच्या जगण्यात जे बदल झाले, त्यातच त्यानं लावलेला छपाईयंत्राचा शोध असेल किंवा टपालव्यवस्थेचा शोध असेल, या सगळ्या शोधांनी माणसं एकमेकांशी कसा संवाद साधायसा लागली, त्यातून काय गमतीजमती घडत गेल्या, या शोधकर्त्यांना कुठकुठल्या अडचणींना तोंड देत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागलं, त्या त्या काळात तंत्रज्ञान कसं बदलत गेलं, तंत्रज्ञानानं माणसाच्या संवादात काय बदल घडवून आणले, या प्रवासात किती तंत्रज्ञांचा मृत्यू अत्यंत हलाखीत झाळा आणि किती जणांचं आयुष्य प्रचंड वैभवात गेलं, हे सगळं या पुस्तकात बाचकांची उत्कंठा वाढवणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शोधाचा शोधकर्ता, त्या शोधामागचं तंत्रज्ञानदेखील ‘संवाद’मध्ये अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आदिमानवापासून व्हॉट्सअपच्या युगापर्यंत माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला याविषयीची एक रंजक आणि चित्तथरारक कहाणी म्हणजे ‘संवाद’! यामध्ये शिंग, तुतारी, आगीपासून ते भाषेचा आणि लिपीचा उगम, कागद आणि छपाई यांचे शोध, टपालव्यवस्था, वर्तमानपत्र, मोबाइल फोन, फेसबुक आणि व्हॉट्सअप या सर्वांच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जन्मकथा आपल्याला ‘संवाद’मध्ये खिळवून ठेवतील.
Revolution 2020: रिव्होल्यूशन २०२०
Par Chetan Bhagat. 2016
भारताच्या एका छोट्याशा गावात दोन हुशार तरूण होते. एकानं हुशारी वापरली पैसा मिळवण्यासाठी. दुसऱ्यानं हुशारी वापरली क्रांतीचा आरंभ करण्यासाठी. पण…
एक समस्या होती... दोघांचंही एकाच मुलीवर प्रेम होतं. ’रिव्होल्यूशन २०२०’ ही कथा आहे गोपाल, राघव आणि आरती या तीन बालमित्रांची वाराणसीत राहणाऱ्या या तिघांचा यश, प्रेम आणि सुख मिळवायचा संघर्ष या कादंबरीत चित्रित केला आहे. भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या या समाजात हे मिळवणं सोपं नसतं. गोपाल ’सिस्टम’ला शरण जातो तर राघव तिच्याशी दोन हात करतो... अखेर विजय कोणाचा होतो? चेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विश्वाशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे. ’फाईव्ह पॉईंट समवन’, ’वन नाईट द कॉल सेंटर’, ’द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ’टू स्टेटस’ नंतर ची ‘रिव्होल्यूशन २०२०’ ही कादंबरीही वाचकांना खिळवून ठेवेल. तुम्ही रिव्होल्यूशन करीता तयार आहात का?
Swapna Chalun Aale: स्वप्न चालून आले
Par Dr Hrishiskesh Pradeep Bodhe. 2023
स्वप्न चालून आले! अरे, व्वा! शाब्बास. थोडा उशीर झाला असेल पण अखेर तुम्ही सुद्धा ह्या विषयाकडे वळलातच. अहो, कोणता विषय…
काय विचारता ? प्रेमाचा विषय. अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत सदा सर्वकाळ मनुष्य जातीसाठी जाज्वल्य असणारा विषय म्हणजे प्रेम. आपली ही एक मस्त मधुर, चटकदार आणि यशस्वी अशी प्रेम कहाणी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर पण ज्यांची प्रेम कहाणी यशस्वी होते ते नशीबवान लोकं आयुष्य खऱ्या अर्थाने अनुभवतात. ज्यांची होत नाही त्यातले काही जण प्रेम कहाणी लिहितात आणि काही आयुष्य भर त्या प्रेमाची प्रतीक्षा करत राहतात. काहींचा इतका ही संयम नसतो म्हणून त्यांचा प्रेमावरून विश्वासच उडतो. त्यांना दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त वासना पूर्तीच साधन वाटतं. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वासना सुद्धा. सरते शेवटी उरतात ती लोकं ज्यांच्यात संयम असतो पण कायमच प्रेमाला मुकलेले असतात. अशा लोकांच्या डोळ्यात सतत प्रेम मिळवण्याची तळमळ दिसते… पण प्रेम असं कधी मिळवता येतं का? प्रेम तर फक्त करता येतं. देता येतं. उधळता येतं. प्रेम फक्त एक भावना किंवा एक घटना नव्हे तर तो एक सतत चा प्रवास आहे. स्वतः पलीकडं जाण्याचा प्रवास . स्वत्वाच्या सीमा तोडून आपल्या सर्वस्वाची उधळण दुसऱ्या अंतरंगावर करत राहण्याचा प्रवास. अंतरंगा द्वारे अनंत मिळवण्याचा प्रवास. ही कहाणी म्हणजे असाच एक गोड गुलाबी आणि गुलजार प्रवास आहे. गायत्री, महेंद्र, श्रुती, वेदांत, गिरिजा, सुजय आणि संचिता यांच्या अंतरंगाचा…
Swami: स्वामी
Par Ranjeet Desai. 1962
महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई: मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली…
'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये 'रुपमहाल' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. 'स्वामी'ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही. कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.